ना कळले कधी Season 1 - Part 35

(99)
  • 14.2k
  • 3
  • 8.8k

    सिद्धांत सकाळी उठून छान तयार झाला. आज संध्याकाळची तो फार आतुरतेने वाट पाहत होता. इकडे आर्याला जास्त काही फरक पडत नव्हता कारण सिद्धांत बोलेल की नाही ह्या वर तिला अजूनही शंका होती, पण ती खुश मात्र होती. ती तयार होत असतानाच तीचं लक्ष तिच्या डायरीकडे गेलं आणि तिने डायरी हातात घेतली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. 'किती वेडा आहे सिद्धांत. इतकं वाचलं तरीही बोलू नाही शकला, कस होणार ह्याच.. ह्याला फक्त राग व्यक्त करता येतो. प्रेम करू शकतो पण व्यक्त नाही करता येत. बघू आज संध्याकाळी काय देतो प्रश्नांची उत्तरं.....' 'काय ग दीदी, अस एकटीच काय हसतीये.. बरी आहेस