धुक्यातलं चांदणं ....... भाग १५

(13)
  • 9.1k
  • 1
  • 5.9k

दिवस असेच जात होते. पावसाळा संपत आला होता. विवेकला भेटून दीड महिना झाला होता. आणि तेव्हापासून पावसाने एकदाही तोंड दाखवलं नव्हतं. पूजा सकाळी बँकमधे जाण्यासाठी निघाली.विवेक आणि सुवर्णाची भेट न व्हावी म्हणून ती बँकमध्ये लवकर जात असे आणि लवकर निघत असे. तिच्या चेहऱ्यावरच तेज पूर्णपणे झाकोळलं गेलेलं, घरातून निघणार तेव्हाचं वडिलांनी थांबवलं."लवकर ये घरी… तुला बघायला येणार आहेत." तेव्हा तर तिला रागच आला." मी येणार नाही आणि मला लग्नही करायचे नाही. या सगळ्यांचा वैताग आला आहे मला. जीव घुसमटतो इथे माझा." म्हणत ती धावतच खाली आली. तशीच ट्रेन पकडून ती स्टेशनला उतरली. बँकमध्ये जाण्याचा बिलकुल मूड नव्हता. खूप दिवसांनी आभाळ