गणपती बाप्पा मोरया - भाग-३

  • 11k
  • 1
  • 4.6k

पुण्याजवळ चिंचवडला गणपतीची स्वयंभू मुर्ती असून त्या ठिकाणी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मोठा उत्सव करण्यात येतो. इथल्या मोरया गोसावी नावाच्या साधूने गणपतीला प्रसन्न करून घेतले होते. मोरया गोसावीची भक्ती इतकी होती की मंदिराबाहेर बसलेल्या मोरया गोसावीना भेटायला गणपती मंदिर सोडुन बाहेर आला असे म्हणतात . ' मी तुझ्या शरीरात व तुझ्यामागून होणाऱ्या सहा पुरुषांत अंश रूपाने वास करेन असा गणपतीने त्याला “वर” दिला. त्याप्रमाणे मोरया गोसावी व त्याचे सहा वंशज यांच्यामध्ये गणपती वास करतो अशी समजूत असून या सात जणांच्या समाधीची गणपती या नात्याने दररोज पूजा करण्यात येते. या गणपती संस्थानला अनेक भाविकांनी देणग्या दिल्या असून , खुद्द औरंगजेब बादशहानेदेखील