गणपती बाप्पा मोरया - भाग ४

  • 13.3k
  • 1
  • 4.5k

गणपतीची मूर्ती घरी नेताना वस्त्र पांघरून, अनवाणी पायांनी डोक्यावर टोपी घालून नेली जाते. औक्षण करून मूर्ती घरात घेतली जाते. तांदळावर गणपती बसविला जातो. व फुले पत्री घालून पूजा केली जाते .त्यानंतर पाच दिवस दररोज सकाळी, संध्याकाळी सहकुटुंब, शेजारी यांच्यासह सामुदायिक आरती, काही ठिकाणी अथर्वशीर्ष पठण होते. प्रसादवाटप होते. सकाळ संध्याकाळ वेगवेगळा प्रसाद वाटला जातो .दैनंदिन ताणतणावातून थोडी सुटका मिळत असल्याने कौटुंबिक, सामाजिक वातावरण चैतन्यमय वाटते. जीवनात काही काळ शुद्ध भावना, शांत, प्रसन्न प्रेरणादायी वातावरण यांची निर्मिती होते. गणपतीच्या रूपातून काय शिकायला मिळते ? त्याचे छोटे डोळे नाव, "पिंगाक्ष", मोठे डोके अर्थात मेंदू नाव "गजानन" हे सांगतात की छोट्या डोळ्यांनी आजूबाजूला चालले