गणपती बाप्पा मोरया - भाग ५

  • 8.8k
  • 1
  • 3.2k

सार्वजनिक गणेश उत्सवात भजन ,पुजन ,कीर्तन हे सामाजिक कार्यक्रम केले जातात .पूर्वी या काळात रस्त्यावर सिनेमे दाखवले जात असत .आता करमणुकीचे कार्यक्रम केले जातात .एक दिवस सत्यनारायण पूजा ही ठेवली जाते .सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन हे अनंत चतुर्दशीलाच केले जाते .मोठ मोठ्या मिरवणुकी काढुन ताल वाद्यांच्या गजरात हे गणपती शहरातील तळी अथवा नदीत विसर्जन केले जातात .घरगुती गणपती विसर्जन प्रत्येक घराच्या प्रथे नुसार केले जात असते काही घरात अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते व गणेश विसर्जन त्या दिवशीच केले जाते.अनंत चतुर्दशीचे व्रत भाद्रपद शुध्द चतुर्दशीला केले जाते .अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि