चला जाऊ आमराईत

  • 10.2k
  • 3.2k

चला जाऊया आमराईत! एका मोठ्या शहरापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर एक मुलींची आश्रमशाळा होती. शाळेला लागून असलेल्या दुसऱ्या भव्य इमारतीत मुलींचे वसतिगृह होते. ती शाळा आणि ते वसतिगृह राज्यात नामांकित होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालक आपापल्या मुलींना तिथे प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करीत असत. शाळा आणि वसतिगृह यांच्या अवतीभोवती फार मोठे जंगल असले तरीही त्याची व्यवस्थित निगा राखली असल्यामुळे एक सुंदर वन तयार झाले होते. शाळा आणि वसतिगृह यांच्या दोन्ही बाजूला छान छोटी छोटी तळी होती. या तळ्यांपासून काही अंतरावर आंब्याची मोठमोठी झाडे होती. दोन्ही इमारतीच्या भोवताली कुंपणाच्या मोठमोठ्या भिंती असल्यामुळे बाहेर जाण्यासाठी किंवा आत येण्यासाठी एक मोठे फाटक होते.