°° मी एक मुंगी, तू एक मुंगी °° प्रशिक्षणासाठी उशीर होतो आहे म्हणून मी गडबडीने निघालो. घाईघाईत जात असताना अचानक ठेसाळलो. ठेस पायाच्या अंगठ्याला लागली असली तरीही वेदनेची एक कळ पार सर्वांगात शिरली. कुणीतरी शिव्या दिल्या हा अंधश्रध्देला खतपाणी घालणारा विचार माझ्या डोक्यात शिरलाच.शिव्या जरी दिल्या नसल्या तरी कुणी तरी आठवण नक्कीच केली हा विचार डोक्यात शिरत असताना एक मूर्ती चटकन डोळ्यासमोर आली....संभामामा! तसे पाहिले तर संभामामा ना माझ्या नात्यातला ना गोत्यातला. मात्र, गेली काही वर्षे तो माझ्या