रातराणी.... (भाग ३ )

(11)
  • 9.4k
  • 5.9k

चंदन आला १० मिनिटांनी, " कुठे गेला होतास... एक मॅडम बडबडून गेल्या तुझ्यामुळे... " ," कोण आलेलं ? " ," नावं नाही सांगितलं... तुला मेसेज करून ठेवते असं बोलून पुढे बोलल्या , फोन वाजला कि receive करायचा... तुझा फोन मी कसा उचलणार... बरोबर ना... " विनयने सगळी हकीकत सांगितली. " अशी बोलली का ... बरं " चंदनने मेसेज बघितला. " व्वा !! चांगलीच व्यक्ती भेटली तुला.. " ," का ... काय झालं... ".... विनय ... " आधी सांग... तिला मॅडम वगैरे काही बोललास का.... " ," हो रे ... पण तुला कसं कळते सगळं... " ," तिला आवडतं नाही.... एकेरी बोलायचे तिच्याशी... तुला