रातराणी.... (भाग ५)

  • 7.5k
  • 3.7k

विनयच्या डोळ्यासमोरुन गेला हा सर्व सिनेमा. काय दिवस होते ना ते.... मंतरलेले दिवस अगदी. किती प्रयन्त केले या सर्वांना एकत्र आणण्यासाठी. पण सुरुवात झाली ती ... त्या दिवशी. " चंदन .... तू सगळ्यांना मेल करू शकतोस ना एकाचवेळी... " ," सगळे म्हणजे कोण ? " ," पूर्ण ऑफिसला.. " ," का... आणि कसला मेल " ," अरे आज दुपारी ४ वाजता मी एक कार्यक्रम ठेवला आहे. मी गाणी गाणार आहे. " चंदन हसला त्यावर.... " कोणी permission दिली... " , " मोठ्या सरांनी... " ," हो हो... विसरली मी.. तुझी ओळख मोठ्या केबिन मधली आहे... तरी , माझ्या मित्रा... तुला आजच एक