रातराणी.... (भाग ६)

  • 6.4k
  • 3.3k

" मला माहित आहे, मी नवीन आहे इथे.. तरी बोलतो... दिवसाचे २४ तास, त्यातले झोपेचे ८ तास सोडले तर उरलेल्या १६ तासातले.... जवळपास १० तास आपण इथे ऑफिस मधे असतो. घरी गेल्यावर सुद्धा घरातल्याशी इतके बोलणे होतं नाही , जेव्हडे आपण इथल्या लोकांशी बोलतो. एक प्रकारचे कुटुंबच आहे ना हे सगळे.. आणि कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस आपणच साजरा करणार ना.. माहीत आहे तुम्ही कामात सतत बिझी असतात.. म्हणून ... जास्त नाही... फक्त १०-१५ मिनिटांसाठी वेळ काढा... थँक्स.. " म्हणत विनय निघून गेला. विनय निघून गेला तरी अनुजा तिच्या बोलण्याचा विचार करत होती.