११ सप्टेंबर, नेहाच्या लग्नाच्या इंव्हीटेशन कार्ड वर हीच तर तारीख होती.काही वर्षांपूर्वी अमेरिकेला ह्याच तारखेने रडवले होते ९-११, बहुदा आज माझा दिवस होता. नेहा रीतसर घरी येउन लग्नाची पत्रिका देऊन गेली होती, पण मी मात्र नेमकं त्याच वेळेस ‘बँगलोर’ला ऑफिसच्या कामासाठी जावं लागत आहे म्हणून `जमणार नाही’ असं आधीच सांगून टाकलं होत. नेहाच लग्न ठरलं आहे, किंबहुना तिचा साखरपुडा झाला हा विचारच मला किती असह्य झाला होता. तर मग तिला दुसऱ्याच्या गळ्यात माळ घालताना पहाण तर नेक्स्ट-टू-इम्पोसिबल होत. नेहाने खूप इन्सिस्ट केलं, पण तिच्या लग्नाला जायचं? का नाही? ह्याबद्दल माझ्या मनात कोणतेही दुमत नव्हते.मी तिच्या लग्नाला जाणार नव्हतो… फायनल !! ‘त्या’ दिवशी