ना कळले कधी Season 2 - Part 8

(15)
  • 9.7k
  • 2
  • 7.6k

तिला कितीतरी वेळ झोप लागत नव्हती. सतत डोक्यात विचार चालू होते. सिद्धांत चा तिला प्रचंड राग येत होता. असा कसा वागू शकतो हा? वाटलं आता सगळं चांगल होईल पण नाही मी उगाचच इतकी अपेक्षा ठेवली. सिद्धांत कधीच नाही सुधारू शकत. पण मला क इतका त्रास द्यायचा जाऊ दे मी पण त्याचा विचार नाही करणार मुळात आता मला ही काही घेणदेण च नाही त्याच्याशी मी लक्ष च नाही देणार त्याच्या कडे त्याला जेव्हा आठवेन तेव्हा आठवेन. ह्याच विचारात तिला खूप उशीरा झोप लागली. इकडे सिद्धांत ची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्याच सारख सारख लक्ष आर्या कडेच जात