ना कळले कधी Season 2 - Part 9

(19)
  • 10.2k
  • 1
  • 8.7k

सिद्धांत ने आर्या ला दिलेली सगळी कामे तिने व्यवस्थित पूर्ण केली. त्यामुळे तो बराच खुश होता. पण आर्या मात्र खूप थकली होती. चल आर्या निघायचं तो तिला म्हणाला. हो अरे एक 10 मिनिटे थांबतो का? ती अजूनही कामातच होती. अग करशील उद्या, चल ना! तो म्हणाला. आता नाही गेलं तर पुन्हा ह्याला राग येईन आणि मग पुन्हा चिडेल नको ऑफिस मध्ये भांडण नको घरी जाऊन तेच करायचं आहे ! तिने लगेचच सिस्टीम बंद केली आणि निघाली. गाडी मध्ये बसल्यावर तिला चांगलाच क्षीण जाणवायला लागला तिने डोळे मिटुन घेतले. आर्या काय झालं बर नाही वाटत आहे का? सिद्धांत ने विचारलं.