प्यार मे.. कधी कधी (भाग-८)

(17)
  • 14.9k
  • 1
  • 10.1k

आयुष्य कध्धीच.. कुणासाठीच.. कश्यासाठीच थांबत नाही का?आपला म्हणवणारा वेळ, खरंच आपल्यासाठी असतो का?क्षुद्र.. किडुक-मिडूक भासणारा सेकंदकाटा सुध्दा आपण थांबवु शकत नाही का? दिवस भराभर पलटत होते.. नेहाचं लग्न झालं त्याच्या दुसर्‍याच दिवशी.. रविवारी.. वाटलं होतं आजचा मोकळा वेळ आपला जिव घेणार, पण झालं उलटच.. जरा कुठं आवरुन होतं नाही तोवर.. विनीतचा, ऑफीसमधल्या कलीगचा फोन आला.. “अरे कस्टमर इश्यु आहे.. पट्कन लॉगीन कर.. तुला ब्रिफ करतो…” हाय.. हॅलो.. गुड मॉर्नींग कसलीही फॉर्मॅलीटी न करता तो म्हणाला ह्यावरुनच ‘आग लागलेली आहे’ ह्याची जाणीव झाली.‘कस्टमर हा भगवान असतो’ असं आम्ही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत म्हणतो आणि बर्‍याच वेळा ते पाळतोही.. किंवा पाळावे लागतेच. लगेच लॅपटॉप