शुज आणि गणित

  • 7.5k
  • 1
  • 2.4k

"शुज" आणि गणित....३६ चा आकडा होता म्हणाना...लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥" ...नाही मानतो मी लहानपणीचा काळ सुखाचा होता.. पण केव्हा जेव्हा गणिताचा अभ्यास नसायाचा तेव्हाच...ह्या गणिताने माझे आणि माझ्यासारख्या किती जणांचे बालपणी जगणे नकोसे करून टाकले होते. साई x साई = ३६ आणि साई x सक्कम = ४२ अशी दोन वेगळी वेगळी उत्तर दिल्यावर धपाटा नेहमीचा होता...घड्याळातले साडे-तीन म्हणजे ३.३० आणि गणितातले साडे-तीन म्हणजे ३. ५० असे का? बर तेही सोडून द्या घड्याळात ३.३० वाजले म्हणजे साडे-तीन पण तेच १. ३० त्याला दीड का ?? साडे१ का नाही ? असे प्रश्न माझ्या बालसुलभ आणि निरागस