निशब्द - भाग 1

  • 22.3k
  • 3
  • 11.9k

लोक अस म्हणतात की आयुष्यात प्रेम एकदाच होत पण 11 वीच्या पहिल्याच दिवशी मला अगदी उलट अनुभव आला ..कोण त्या इना , मीना , सोना समोरून जाव्या आणि मी पुढच्याच क्षणी प्रेमात पडावं अशी माझी स्थिती ..अशीच दोन वर्षे एन्जॉयमेंट या नावाखाली काढली ..12 विचा निकाल आला तेव्हा मिळालं ते अपयश फक्त अपयश .. बी.ए . पहिल्या वर्षाचा तो पहिला दिवस होता ..घरची परिस्थिती त्यावेळी बेताची असल्याने मला तेव्हा कामाला जावं लागलं होत ..वर्गाच्या उंबरठ्यावर उभा झालो आणि सरांना आत येऊ का असा प्रश्न विचारला ..तसा प्रश्न सोपाच होता पण सर आणि विद्यार्थी जणू असे पाहत होते की काही क्षणांसाठी