तू माझा सांगाती...! - 6

  • 7.1k
  • 2.7k

"नांव काय तुझं?" जनार्दन सारंग यांनी प्रसन्न मुखानं स्मित करून त्या रोबोटला विचारलं."यूनीट 15 ओर्डर नंबर 26. सर!""खूपच मोठं नांव आहे! अगदी ग्रेट वॉल ऑफ चायना!" जनार्दन हसत म्हणाले. त्यांच्या टिप्पणीवर यूनीट 15 ओर्डर नंबर 26 देखील हसला. "अरे तुला हसता येत?" जनार्दन सारंग चेहऱ्यावरील आल्हाद ओसरू न देता आश्चर्याने विचारलं."हो सर! मी त्या सर्व भावना दर्शवू शकतो, ज्या तुम्ही दर्शवू शकता! आपली इच्छाच तशी होती." यूनीट 15 ओर्डर नंबर 26 जनार्दन यांना म्हणाला."आम्ही भावना दर्शवत नाही. त्या अनुभवतो. ते तू करू शकतोस?" जनार्दन यांनी त्याला परंतू केला."अंफॉर्च्युनेटली, नाही सर." यूनीट 15 ओर्डर नंबर 26 उत्तरला."शकशील!" जनार्दन हसत म्हणाले,"माणूस सुद्धा लहान असताना