जुळले प्रेमाचे नाते - भाग-१

(55)
  • 47.8k
  • 5
  • 35.1k

गुड आफ्टरनून.......,आज मी माझ्या शाळेतल्या काही फ्रेंड्स ला भेटायला जातेय. गेट टु गेदर आहे आमचं. तु जेवुन घे कारण, मी तिकडूनच खाऊन येणार आहे. आणि हो काळजी घे. मिस यु. बाय चला याला मॅसेज केला आता निघते नाही तर त्या माझा जीव घेतील. 'मी प्रांजल निशांत चिटणीस. काही महिन्यांपूर्वीच माझं लग्न झालं आणि मी देखील इतर नवीन लग्न झालेल्या महिलांसारखी नटून-थटून जातेय आज छोट्याच्या गेट टु गेदर ला. जास्त नाही मेकअप करत. याला नाहीच आवडत मी जास्त केलेला मेकअप. पण मी लावलेलं आयलाईनर आणि लिपस्टिक हेच त्याला प्रचंड आवडत. खरतर माझ्याच घरी ठरलं होतं भेटायचं. पण सगळ्यांना दुर पडलं असत