'आर्या तू उठलीच आहेस तर थोडस खाऊन घे' तो म्हणाला. नाही अजिबात नाही मला ईच्छा च नाही आहे आर्या म्हणाली. हे बघ तुला कुणी विचारलं नाही मी सांगतोय खाऊन घ्यायचं. तो थोडासा रागवूनच म्हणाला. सिद्धांत please नको ना आता काहीच मी हवं तर थोड्या वेळाने खाईन. त्याने तिचं काहीही ऐकलं नाही तो सुप घेऊनच आला. चल इतकं संपव नंतर पुन्हा खा, आणि आर्या मला नाही ऐकायची सवय नाही,माहिती असेल ना तुला? तो हक्काने म्हणाला. तिला ही माहिती होत आता आपलं काहीही चालणार नाही एकदा हा जिद्दीला पेटला की कुणाचही ऐकत नाही. त्याने आर्याला उठवायला मदत केली तो स्वःत तिला भरवत