तिला जाग आली तेव्हाही तो तिच्या जवळच बसून होता तो कामात होता पण तरीही तिच्याच जवळ तिला लग्ना आधीचा सिद्धांत आठवला तो ही असाच बसायचा तिच्या काही झालं की. माणूस मुळात बदलत नसतो त्याचा स्वभाव च आहे हा तो नाही बदलणार ह्याही परिस्थितीत तिला त्याला अस जवळ बघून छान वाटल. त्यात आज त्याने घेतलेली काळजी आणि नकळत पणे 'बायको' असा केलेला उल्लेख तिच्या ओठांवर हसू आणून गेला. सिद्धांत आज अगदी पूर्वीसारखाच वागत होता. तोच तर तिला आवडायचा. आज च त्याच वागणं पाहून तिला तो नव्याने आवडू लागला. मला कितीही हा सिद्धांत हवाहवासा वाटला तरी फार काळ