प्यार मे.. कधी कधी (भाग-१०)

(16)
  • 15.5k
  • 1
  • 8.4k

सकाळपासून शंभरवेळा मोबाईल चेक करून झाला, पण प्रितीचा काहीच मेसेज नव्हता. ‘लास्ट सीन ऑनलाइन’ पण बंद करून ठेवले होते. मी काही कोणी मनकवडा नव्हतो, पण समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला अदृश्य अश्या वेव्हज मिळत असतातच ना. गाडीवर प्रितीने ‘फिर मोहोब्बत’ च ऐकवलेले गाणे?घरी जाताना ‘मला दुसरी नेहा व्हायचं नाही’ अस प्रीती म्हणाली होती, त्याचा अर्थ काय असू शकत होता? आणि नेहाच्या घरी समशेर म्हणाला होता ते? अनेक वेडे वाकडे तुकडे एकत्र जोडून मी त्याच चित्र बनवू पाहत होतो. पण त्यावरून स्पष्ट अर्थबोध होत नव्हता. कदाचित, हे सगळे माझ्या मनाचेच खेळ होते. प्रिती प्लीज.. प्लीज ऑनलाईन ये… मी अगदी मनापासून याचना करत होतो,