नवरंगी नवरात्र - भाग ३

  • 6.5k
  • 2.1k

दुर्गापूजा बंगाल आणि बिहार ,ओडीसा ,उतर प्रदेश या राज्यांत साजरे होणारे हे सहा दिवसांचे नवरात्र असते. ललिता पंचमीच्या दुसर्या दिवसापासून, म्हणजे षष्ठीपासून ते दसर्यापर्यंत हा उत्सव चालतो. महाअष्टमी(दुर्गाष्टमी)ला बकर्याचा आणि महानवमीला रेड्याचा बळी दिला जातो. दुर्गापूजा हा बंगाली लोकांचा वर्षातील महत्त्वाचा सण आहे. सुरुवातीला बांधकाम करणारे गवंडी, सुतार वगैरे लोक विश्वकर्म्याची सार्वजनिक पूजा करतात. दुर्गापूजा हा मूळचा धार्मिक सण होता, पण सध्या त्याला सामाजिक स्वरूप आले आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस दुर्गेचे नवरात्र मानतात. नवरात्रात नित्य दुर्गापूजा केली जाते. पूजा करताना घरचे मुख्य पुरुष सकाळी पाण्यात पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करतात. मग सपत्नीक