३ पुढे काय? अर्थात वो कौन है? प्रेम म्हणतो शिक्षण आपल्याकडे जीवनाभिमुख नाही. जीवनाभिमुख म्हणे!म्हणजे काय कोणास ठाऊक. त्याला विचारले तर वर्ग घेतल्यासारखा लेक्चर देईल. त्यापेक्षा जाऊ देत. नसेल जीवनाभिमुख तर त्याला मी तरी काय करणार? पण एक आहे, तसे म्हणत ही त्याने घेतलेच ना ते शिक्षण तसे जीवनाभिमुख नसूनही. मग कशाला उगाच बडबडतो कोणाला ठाऊक. मी मात्र ते तसे नाही हे आधीच समजून उमजून जास्त शिक्षणाच्या वाटेलाच गेली नाही. उगाच जीवनाभिमुख की काय नसलेले शिक्षण कशाला? त्यापेक्षा मला व्यवहारी ज्ञान जास्त आहे. जगाच्या पाठीवर कुठेही ते उपयोगी पडेल.. हो की नाही? तर प्रेमला अशा खूप गोष्टी शिकायच्या