तू माझा सांगाती...! - 11

  • 8.9k
  • 1
  • 2.9k

विक्टर सुन्न होता, त्याच्या अंधाऱ्या सेल मध्ये बसून... असह्य दुःखानं जणू काही त्याला झाकोळून टाकलं होतं... तो स्वतःशी पुटपुटला..."मला माहिती आहे बाबा... तुम्हाला मला हर्ट करायच नव्हतं... मी तुम्हाला आत्महत्या करू दिली नसती... ना तुमच्या विनंती वरून मी तुम्हाला मारण्यास सक्षम होतो... म्हणून तुम्ही माझ्यावर हल्ला केलात... तुमच्या नजरेत दिसलं मला... तुम्हाला आता जगण्याची इच्छा राहिली नाही... आणि मरण... ते आपल्याला हवं तेव्हा थोडीच येतं... म्हणून तुम्ही रोबोटीक्सच्या नियमानांच मॅनिप्युलेट केलंत... यू मेड मी मोअर लाईक ह्यूमन व्हाईल माय एआई वॉज डेव्हलपिंग आणि म्हणूच रोबोटिक्सचे लॉज् आता माझ्यावर वर्क होत नाहीत... आणि तुम्ही त्याचाच फायदा उचलतात."माझ्या रक्षणासाठी मी तुम्हाला मारलं