प्रीतीची 'प्रेम'कथा - 4

  • 7.1k
  • 2.7k

४ तो सापडला? अर्थात तुंबाऱ्याची गोष्ट! सकारात्मक विचारांचा सकारात्मक फायदा लवकरच दिसला मला. म्हणजे त्या अजनबी राजकुमाराचे दर्शन वगैरे नाही, पण घरातच काही हिंट मिळाली मला. म्हणजे झाले असे की इतक्या दिवसात मला समोर असून दिसले कसे नाही कुणास ठाऊक! किंवा स्वामीजी म्हणतात तशी वेळ यावी लागते एखाद्या गोष्टीची! त्या दिवशी संध्याकाळी बसले होते बाहेरील झोपाळ्यावर झोके घेत. हवा सुटलेली जोराची. मनातही अर्थातच, तेच विचारांचे झोके! तात्या बाहेरून आले तेच घाईघाईत. घरात शिरले.. समोरच्या कपाटातून त्यांनी एक पुस्तक काढून बाहेर ठेवले आणि आईला म्हणाले, "अगं जातो मी लगेच. ते पुस्तक राहून गेलेय त्यादिवशी. ते देऊन येतो." माझ्या