मरणाला काय घाबरायचे? 

  • 11.7k
  • 2.5k

मरणाला काय घाबरायचे? मानवी जीवन खूप सुंदर आहे. त्याचा प्रत्येकाने परिपूर्ण उपभोग घेतला पाहिजे. जीवन जगत असताना मरणाला घाबरून कसे चालेल. माणसाचं वागणं काहीसे विपरितच असते. तो मरणाला खूप घाबरतो. मात्र एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे की वेळ आल्याशिवाय मरण येत नाही. वेळेपूर्वी कितीही संकटाचा सामना करा तुम्ही जिवंतच राहणार अन वेळ आल्यावर कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही. हे जर वास्तव असेल तर मरणाला घाबरून कसे चालेल. आजकाल टीव्ही मोबाईल पाहणारेच मरणाला खूप घाबरतात. त्यात मरणाला प्राधान्य देणारेच कार्यक्रम असतात. बातम्या, सिरीयल, चित्रपट, मेसेजेस मरणाचेच प्रतिनिधित्व करतात. शुगर, बीपी, नैसर्गिक आपत्ती, जगबुडी, युद्ध, विविध रोग