ऑफीसमध्ये सगळ्यांचा मुडच एकदम वेगळा होता. प्रचंड तापदायक, कष्टदायक प्रयत्नांनंतर अखेर आमचं रिलिज झालं होतं. बॅंगलोरहुन आमचे डायरेक्टर खास आमच्या टिमला भेटायला आले होते आणि संध्याकाळी एका पॉश रेस्टॉरंटमध्ये पार्टी होती. कामाचं सोडा, सकाळपासुन कुणी ई-मेल्सलाही -हात लावला नव्हता. आणि माझा मुड खराब असण्याचं तर कारणंच नव्हतं. नुकत्याच प्रेमात पडलेल्या कुणाला तुम्ही दुःखी-कष्टी पाहीलं आहे का कधी? संध्याकाळी पार्टीमध्ये काही तरी भारी अनाऊंन्समेंट होणार ह्याची सर्वांना कुणकुण लागली होती आणि त्यामुळे सगळे सुपर एक्साईटेड होते. मे बी प्रमोशन्स.. मे बी पगारवाढ.. बोनस.. तर्कवितर्कांना नुसते उधाण आले होते. ‘स्टोन-वॉटर-ग्रिल्स’ आमच्या टिमने पार्टीला दणाणुन सोडलं होतं. डि.जे. पण जाम मुड मध्ये होता..