चांदणी रात्र - ६

(14)
  • 9.2k
  • 5.5k

राजेशने चहा बनवण्यासाठी दुधाचं पातेलं गॅसवर ठेवलं व तो दात घासण्यासाठी बाथरूममध्ये गेला. दात घासुन झाल्यावर राजेश परत स्वयंपाकघरात गेला व चहा बनवून चहाचा कप घेऊन तो हॉलमध्ये आला. रवी नेहमीप्रमाणे झोपला होता. राजेशने टीव्ही चालू केला व टीव्ही पाहतच चहा संपवला. आज रविवार असल्यामुळे कॉलेजला सुट्टी होती. आजचा दिवस कसा घालवायचा याचाच राजेश विचार करत होता, तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोन वृषालीचा होता. एका क्षणाचाही विलंब न करता त्याने फोन उचलला. “खूप बोर होतंय. ये ना घरी. आई-बाबा पण गावाला गेलेत. मी तुझ्यासाठी सँडविच बनवते मग आपण एखादी मुव्ही पाहुयात.” वृषाली झोपाळलेल्या, आळसावलेल्या आवाजात म्हणाली. “हो येतोच, मला फक्त अर्धा