वेढ्यातून सुटका - भाग-१

  • 36k
  • 2
  • 26.5k

भाग १ : वेढ्यातून सुटका (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) धो-धो बरसणारा पाऊस अन घोंघावणारा वारा आपल्याच तालात झाडाझुडपांना नाचवत होता. विजांचा कडकडाट अन ढगांच्या गडगडाटांसह बरसणाऱ्या शंभूरूपी निसर्गाने रौद्र रूप धारण करून जणू तांडवनृत्यच चालवले होते. डोंगर दऱ्यांतून अन कड्या-कपारीतून खळखळ वाहणारे पाणी पांढऱ्याशुभ्र दुधाप्रमाणे भासत होते. सकाळचा प्रहर अन मध्यरात्रीचा काही घटकांचा वेळ सोडला तर पावसाची रिपरिप अखंड चालू होती. गडावरून वेगाने वाहत येणारे पाणी आणि धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त