मृगजळ

  • 15.2k
  • 3.6k

मृगजळ जुईला काही सुचत नव्हतं. मयंक आयुष्यातून असा अचानक निघून जाईल तिनं कधी कल्पनाही केली नव्हती. एक दोन नाही तर सहावर्षांचा संसार किती सहजपणे सोडून गेला हा. माझा नाही निदान पिहूचा तरी विचार करायचा. आता ती शाळेतून आल्यावर मी तिला काय सांगणार? तिचा बाबा कुठे गेला.... आपल्याला सोडून गेला. त्या क्षणी राग आवरत तिनं आईला फोन केला."हॅलो आई, संपलं ग सगळं " जुईने घडलेला वृत्तांत आईला सांगितला." काळजी नको करू बाळा. मी उद्या सकाळच्या फ्लाईटने पोहचते. पिहूसाठी स्वत: ला सावर." आईनं तिला धीर देत म्हंटलंमेघनाला फोन करुन सांगायला हवं होतं. तिच्याशी बोलायचा धीर झाला नाही. म्हणून तिनं तिला मॅसेज टाकला.