भारतीय दीपावली - भाग १

  • 4.1k
  • 1.7k

भारतीय दीपावली भाग १ या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर धृवप्रदेशात होतं, त्या काळात झाला, असं मानण्यात येतं. सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होताच त्या प्रदेशातील लोकांना नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखे वाटत असणार आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव साजरा करत असावेत. आर्यांच्या सात पाकयज्ञांपैकी पार्वण, आश्वयुजी व आग्रहायणी या तीन यज्ञांचे एकीकरण व रुपांतर होऊन दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा, अशी कल्पना आहे. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, चौदा वर्षांचा वनवास संपवून राम सीतेसह अयोध्येला परत आला, ते याच दिवसांत. या आनंदा प्रीत्यर्थ त्या वेळी अयोध्येतल्या प्रजेने दीपोत्सव केला