आली दिवाळी - २

  • 6.1k
  • 2.6k

आली दिवाळी भाग २ दिवाळीचा पहीला दिवस ,आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी . पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळी हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस दीपोत्सवाचे असतात. या दिवशी वस्त्र आणि अलंकाराची खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी उपवासही केला जातो. घरातले अलंकार तिजोरीतून काढून स्वच्छ करून ते पुन्हा जागेवर ठेवले जातात. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग यांची विधिवत पूजा केली जाते. त्यांना नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी शक्य असले तितकं दान करण्यात येतं. सायंकाळी तेलाने भरलेला एक दिवा प्रज्वलित