चक्रव्यूह भेदले - भाग-६

  • 9.1k
  • 4.3k

भाग ६ - चक्रव्यूह भेदले (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) अन अचानक समोरील झाड झुडपांतून येणाऱ्या घोड्यांच्या खिंकाळयांनी आणि हर हर महावेदच्या आरोळ्यांनी शत्रूंची घोडी जागेवरच थबकली. क्षणभर बांदलही गोंधळले. मागे शत्रू अन समोर हे सिद्दी मसूदचे सैन्य आले कि काय? म्हणून राजांच्या मनात क्षणभर भीती दाटली. पण दुसऱ्याच क्षणी समोरून भरधाव येणाऱ्या घोड्यावर आरूढ असलेल्या बाजींना पाहून राजांच्या चेहरा आनंदानं फुलून गेला. पाठोपाठ घोड्यांवर स्वार असलेल्या बांदलांनी डावी अन उजवी कडून एकाच वेळी