ना कळले कधी Season 2 - Part 20

(12)
  • 11.2k
  • 2
  • 5.9k

अरे कुठे गेला हा असा न सांगता! डोक्यात राग घालून गेलाय, कुठे गेला असेल? कॉल करू का? हा पण कसा माझा फोन फोडला ना त्याने . बिचारा माझा फोन, आताच तर घेतला होता . तिने एकवार आपल्या फुटलेल्या फोन कडे पाहिलं तो आजूनही त्याच जागेवर पडून होता. 'मी नाही उचलणार काहीही झाल तरी त्यालाच उचलू दे', कळेल तरी निदान आपण रागात किती नुकसान केलय! 'सिद्धांत ला ना चिडचिड करण्या शिवाय दुसरं काही जमत च नाही!' घरीच येणार होते ना मी दुसरा काही ऑपशन आहे का माझ्या कडे? पण नाही सांगितलं का नाही म्हणून भांडला. बर text पण करून ठेवला