आली दिवाळी - ४

  • 5.4k
  • 2.5k

आली दिवाळी भाग ४ दिवाळीचा तिसरा दिवस असतो लक्ष्मीपूजन नेहेमी अमावस्या अशुभ मानली जाते पण ही अमावास्या हा दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्या दिवशी महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांची पूजा करतात. शाईची दौत, रुपया आणि वही ही त्यांची प्रतिके मानली जातात. याची पुजा खालील प्रकारे करतात एका चौरंगावर लाल रंगाचा कापड घालतात . चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढतात . चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढतात . एक चांदीचा तांब्याचा अथवा मातीचा कलश गंगा जल युक्त पाण्याने भरुन घेतात . कलश चौरंगावर ठेवून कलशावर नारळ ठेवून आंब्याच्या पानानी सजवतात . कलशाभोवती ताजी फुलं सजवतात. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे