शरीरा प्रमाणे मन देखील सुदृढ हवे आज जागतिक मानसिक आरोग्य दिन. माणसाला जर सुखी जीवन जगायचे असेल तर त्याचे शरीर व मन सुदृढ असणे खूप गरजेचे आहे. जीवनातील ताणतणाव हे शारीरिक व मानसिक रोगामुळे उदभवतात. असे म्हणतात की sound mind in sound body. सुदृढ मनासाठी शरीर सुदृढ व सुदृढ शरीरासाठी सुदृढ मन याची गरज असते. आपण वेगवेगळे दिन साजरे करतो तसा आजचा जागतिक मानसिक आरोग्य दिन. आपल्याला दीर्घकाळ जगायचे असेल तर शरीर व मन याची काळजी घेतलीच पाहिजे. मन मुळातच चंचल असते. एका सेकंदात मन कितीतरी विचार करीत असते. रात्री आपण झोपी गेलो की मनाचे विचारचक्र सुरू होते. मन अनेक