ना कळले कधी Season 2 - Part 24

(15)
  • 9.7k
  • 2
  • 5.2k

तिने सिद्धांत कडे पाहिलं, तिला वाटलं त्याची परवानगी घ्यावी. सिद्धांत ला कळलं ते तो म्हणाला, 'माझ्या कडे बघूच नको ह!' 'आपले decisions आपण घ्यायचे'.'आणि मला पण पटत की कुठलीच गोष्ट try केल्याशिवाय चांगली वाईट ठरवू नये'. 'मग हे तुला पण लागू होत ना तू का नाही करत try??आर्या म्हणाली'. 'of course, मलाही applicable आहे, पण तुझ्या माहिती साठी मी आधीच केलीये try and then I have decided'. आर्याचा तरीही विचार चालूच होता. 'अग किती विचार करणार आहेस आर्या?' मंदार म्हणाला. 'अग आर्या इतका विचार नको करू आणि ईच्छा नसेल तर सरळ नाही म्हण त्यात काय एवढं!'. विक्रांत म्हणाला.