ना कळले कधी Season 2 - Part 34

(23)
  • 11.3k
  • 5.3k

सिद्धांत काय शोधतो आहे ? किती वेळ च बघतीये मी! काही हरवलं का तुझं? आर्या ने त्याला विचारल. सिद्धांत सकाळी उठल्या पासून ती डायरी आणि बुक्स शोधत होता. पण ते काही त्याला मिळत नव्हते. नाही ग आर्या काही नाही! काही नाही कस किती अस्वस्थ वाटतोय तू! सांग काय झालं ते. आर्या प्लीज यार! सांगितलं न एकदा काही नाही म्ह्णून का मागे लागलीये तो चिडून म्हणाला. आर्याचा चेहरा पाहून त्याला कळलं की आपण विनाकारणच चिडलो.सॉरी, म्हणजे मला अस नव्हतं म्हणायच पण तू ह्या मध्ये नको पडू. ठीक आहे, आणि ती तिथून निघाली. मला काही कळत नाही का तू