मी एक अर्धवटराव - 10

  • 6k
  • 2.3k

१०) मी एक अर्धवटराव ! नेहमीप्रमाणे मी मारोतीरायाचे दर्शन घेतले. आणि तिथून जवळच असलेल्या आमच्या गॅस कंपनीत गेलो. तिथली कामे करून मी घरी परतलो दाराबाहेर चप्पल काढत घराचे दार ढकलले. ते नुसते लोटलेले होते. मी दारातून आत प्रवेश केला न केला की, आतून हिचा आवाज आला, "अहो, आलात काय?" "होय. आलो की. अग, मला नेहमी पडणारा एक प्रश्न असा की, आजच नाही तर मी जेव्हा जेव्हा बाहेरून येतो आणि तू समोर नसतेस त्या प्रत्येक वेळी तू मला 'आलात काय?' हा ठरलेला प्रश्न विचारतेस? हे तुला कसे जमते ग? तुला कसे समजते ग?"