मी एक अर्धवटराव - 14

  • 4.1k
  • 1.7k

१४) मी एक अर्धवटराव! 'असून अडचण, नसून खोळंबा' अशीच काहीशी अवस्था प्रिय पत्नीच्या भ्रमणध्वनीमुळे नवऱ्याची होते. बायकोला मोठ्या कौतुकानं स्वतंत्र भ्रमणध्वनी घेऊन द्यावा तर भ्रमणध्वनीवरील साऱ्या गोष्टींची जाणीव करून देणे, तिचा फोन चार्ज नसेल तर चार्जिंगला लावणे, तिने कुठेतरी कानाकोपऱ्यात ठेवलेला भ्रमणध्वनी शोधून देणे. ती एखाद्या कामात विशेषतः स्वयंपाकात किंवा दुपारच्या दीर्घ वामकुक्षीत व्यग्र असताना तिचा भ्रमणध्वनी वाजला तर तो इमानेइतबारे तिच्या हातात देणे, हातात देताना तो उचलून (ऑन) देणे ही कामे करावी लागतात म्हणून बायकोचा भ्रमणध्वनी असून अडचणीचा. बरे, बायकोला तिच्या हक्काचा भ्रमणध्वनी नसेल तर मग नवऱ्याचा किती खोळंबा होतो हे मी सांगणे गैरवाजवी होईल.