मी एक अर्धवटराव - 15

  • 4.4k
  • 1.6k

१५) मी एक अर्धवटराव ! 'काय करताय? चला. जाऊ साडी घ्यायला... बाप रे! केवढ्यांदा दचकलात तुम्ही? अहो, मी तुम्हाला साडी घ्यायला येताय का असा साधा प्रश्न विचारला तर तुम्हाला जसे काय मी सीमेवर शत्रूशी लढायला नेतोय असा तुमचा चेहरा झाला. पण खरे सांगू का, तुमची अवस्था एकदम बरोबर आहे. बायकोबरोबर साडी घ्यायला जायचे म्हणजे किंवा बायकोसाठी तिला दुकानात न नेता स्वतःच्या पसंतीने साडी आणायची म्हटलं की, प्रत्येक नवऱ्याचा असाच थरकाप उडतो. नवऱ्याने मोठ्या प्रेमाने आणलेली साडी बायकोला पसंत पडेल याची शून्य टक्के खात्री असते. एखादा नवरा अमेरिकेत गेला म्हणजे आजकाल हे सहज शक्य आहे. तिथली कामे, वास्तव्य