मी एक अर्धवटराव - 17

  • 5.4k
  • 2k

१७) मी एक अर्धवटराव! सकाळचे आमचे कार्यक्रम तसे ठरलेले असायचे. माझे स्नान, पूजा होईपर्यंत नाश्त्याच्या गरमागरम फराळ तयार होत असे. त्यादिवशीही आमचा फराळ सुरू असताना बायको म्हणाली,"देवपूजेच्या बाबतीत मात्र तुमचा हात कुणी धरू शकत नाही. अगदी नंबर वन पुजेच्या बाबतीत! देवांची मांडणी असेल, त्यांची षोडशोपचार पूजा असेल आणि फुलांनी केलेली आरास असेल सारे कसे बघतच बसावेसे वाटते. जशी देवपूजा व्यवस्थित, मन लावून करता तशी इतर कामांमध्ये मन का नाही लागत हो तुमचे? तिथे का कंटाळा करता हो?""मला वाटतच होते की, स्तुतीसुमनाची त्यातही गुलाबपुष्पांची उधळण होत असताना बोचणाऱ्या काट्यांची पाखरण कधी होणार आहे?""जे खरे ते खरे! मग स्तुती