मी एक अर्धवटराव - 25

  • 6.3k
  • 2k

२५) मी एक अर्धवटराव! ती एक सायंकाळ! आमच्या जीवनातील एक मोठ्ठा विनोद जन्माला घालणारी, बायकोने बहाल केलेल्या 'अर्धवटराव!' या पदवीतला सत्यांश पटवाणारी, सिद्ध करणारी. त्या सायंकाळी आम्हाला एका नातेवाईककडे एका समारंभासाठी जायचे होते. ते ठिकाण माझ्या घरापासून बरेच दूर होते. मला दुचाकीवरून जायचा कंटाळा आला आणि हिचीही इच्छा आरामात टॅक्सीने जाऊ अशीच होती. चार वाजता निघायचे होते. बायकोला सजायला, नटायला खूप वेळ लागतो म्हणून हिने तीन वाजल्यापासून तयार व्हायला सुरुवात केली. पावणेचार वाजता ही म्हणाली,"अहो, मी तयार आहे बरे का?""होय. आजकाल तू तब्येतीने चांगलीच तयार झाली आहेस...""मस्करी करू नका. गाडी बुक केली का?""होय. तेच करतोय..." असे म्हणत मी भ्रमणध्वनी