प्रीतीची 'प्रेम'कथा - 18

  • 6.3k
  • 2.1k

१८ समोवार अर्थात भेट तुझी माझी! आता कामाला लागावे म्हणजे काय करावे? साधा उपाय आहे.. प्रेमला फोन करणे. बोलण्यात गुंगवणे आणि त्याच्याशी भेट पदरात पाडून घेणे. त्याचे ते दुसरे पुस्तक हाच माझा पासपोर्ट! तो वापरून पुढच्या हालचाली करायला हव्यात. सकाळी फोन लावला त्याला. घेतला ही त्याने. रंगढंग प्रकाशनाचे रंग डायरेक्ट पुसत म्हणाली, "प्रीती बोलतेय. खूप दिवसात बोलणे नाही झाले." "ओह.. मला वाटते आपण दोन तीन दिवसांआधीच बोललोय.." अरसिक! इथे मी क्षण न क्षण मोजते नि हा दोन तीन दिवस असे म्हणतो जणू दोन तीन मिनिटच असावेत. निर्दयी दिसतोय. "हो ना. कुठवर आले लिखाण? तुम्हा लेखकांचे एक बरे