प्रीतीची 'प्रेम'कथा - 19

  • 4.8k
  • 1.5k

१९ हवेत उडते मी अर्थात भेटी आणि गाठी! आज फिर मिलने का इरादा है.. आज फिर जीने की तमन्ना है.. गाफीलपणे मी गुणगुणत असतानाच आई आली मागून. "काय गं, आज पण जायचेय.. मुक्ताकडे?" "हुं.. कदाचित!" "असेच..?" "नाही गं. तिला कसली मदत हवीय अभ्यासात.." आई काहीच बोलली नाही. हे संध्याकाळी बाहेर जायचे प्रकरण सोडवायला हवे! हे म्हणायला नि कालिंदीचा फोन यायला एकच गाठ पडली. तिच्याशी बोलता बोलता एक आयडिया सुचली मला! आणि दुपारपर्यत मी मिलिंदाच्या आॅफिसात संध्याकाळी पाच ते नऊ अशा पार्ट टाइम जाॅबला लागले! असा कसा हा जाॅब? हा प्रश्न आताही पडतो, तेव्हाही इतरांना पडला पण प्रेमातुराणां मला