प्रीतीची 'प्रेम'कथा - 20

  • 4.7k
  • 2k

२० घडणारे ना टळते अर्थात प्रेमचा धक्का! घरी आली मी. तात्या घरी आधीच पोहोचलेले. काहीच बोलले नाहीत म्हणून जीव भांड्यात पडला. आता फक्त उद्याची चिंता! प्रेम काय सांगणार आहे? मुन्नाभाईच्या त्या सिनेमासारखे म्हणाली मी स्वतःलाच, काय सांगणार तू ते ठाऊक आहे मला.. पण कसे सांगणारेस तेच पहायचेय मला! आज रात्री झोप नाही यायची मला. रात्रीची झोप उडवणाऱ्या माझ्या प्रेमा.. किती रे छळशील तू.. जिवलगा? रात्रभर जागीच होती मी. पहाटे डोळा लागला. स्वप्न पहायची खोड माझी .. ते मी जागेपणीच पाहून घेतलेले. उठली तोवर उशीर झालेला. घरी शांतता होती. तात्या निघून गेलेले. आई कामात. कालिंदीला फोन केला, कालच्या स्ट्राॅबेरीबद्दल