प्रीतीची 'प्रेम'कथा - 23

  • 4.5k
  • 1.9k

२३ सुरूवातीचा शेवट अर्थात घोड्याची गंगेत अंघोळ! 'गुड मा‌ॅर्निंग! स्वप्ने पहायला शिका. स्वप्नांसाठी झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा.. सुप्रभात!' या मोबायल्याची कमाल पहा. त्याने जगच नाही तर दिवसाचे प्रहरदेखील आणलेत जवळ. सकाळसकाळी मी उठली.. रीतसर आळस झटकून. आळोखेपिळोखे दिली मी. समोरच्या मोबाईलात टुणss आवाज आला. हा माझा खास अलार्म म्हणावा.. त्यात आलेला तो गुड मॉर्निंगवाला मेसज!नुसता गुड मॉर्निंग नाही तर ज्ञान वाटप ही त्यात. परत झोपी जा म्हणे! मला काय, मी झोपते! झटकलेला आळस मी परत गोळा केला. गेलेली झोप परत डोळ्यांत जमा केली. पापण्या घट्ट मिटून ती परत उडून जाऊ नये म्हणून