चांदणी रात्र - ८

  • 8k
  • 2.1k

कॉलेज संपताच राजेश आणि संदीप फ्रेश होण्यासाठी राजेशच्या घरी पोहोचले. संदीपने सकाळीच पार्टीला घालायचे कपडे बरोबर घेतले होते. दोघेही आवरून घरातून बाहेर पडले. तासाभरात ते मनालीच्या घरी पोहोचले. मनालीचा बंगला एखाद्या पॅलेसपेक्षा कमी नव्हता. मनालीचे वडील एका नावाजलेल्या कंपनीचे मालक होते. बंगल्यासमोर मोठं लॉन होतं. तिथे टेबल खुर्च्या मांडल्या होत्या. राजेश आणि संदीप जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या वयाची पंधरा वीस मुलं-मुली तिथे होती. त्यांच्या वर्गातल्या काही मुलीदेखील आल्या होत्या. थोड्या वेळाने मनाली तिथे आली. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती फार सुंदर दिसत होती. संदीपची नजर तर तिच्यावरून हाटतच नव्हती. एवढी गर्दी आणि झगमगाट पाहुन तो थोडा बुजला होता. या सगळ्याची त्याला