नवा प्रयोग... - 5

  • 11.8k
  • 2
  • 3.6k

कामगारांची प्रचंड सभा भरली होती. पगार झाला होता. काही दिवस रेटणे आता शक्य होते. पगार हाती पडल्यावर संप – असे मुद्दामच ठरवण्यात आले होते. परवापासून संप! चाळी-चाळींतून प्रचार होत होता. सुंदरपुरात खळबळ होती. सभास्थानाकडे माणसांची रीघ सुरू आहे. गाणी म्हटली जात आहेत. “हम नहीं हटनेवाले, हम हैं लढनेवाले” अशी ती गाणी होती.