फिरून नवी जन्मेन मी - भाग २

  • 18k
  • 10.3k

फिरून नवी जन्मेन मी... तशी लहान असल्यापासुनच आमची मैत्री... मी येताच ओंजळ भरून करवंदे घेऊन यायची. दिवस भर आम्ही दोघे डोंगरावरून जांभळे, करवंदे खात हूंदडत फिरायचो. आंब्याच्या कच्च्या कै-या दगड मारून पाडायच्या आणि त्या खाण्यासाठी सोबत थोडी तीखट आणि मीठ ही खिशात असायच... पण कसे इतके जवळ आलो समजलच नाही. स्वता काट्यांमधुन वाट काढत माझ्यासाठी करवंदे जमवायची, स्वतासाठी नाही पण मला काटा लागला तर मनापासुन हळ हळायची. पण आता मीही तीला जपत होतो. तीला सोडून जावस वाटत नव्हत, रात्र कधी संपेल आणि कधी पुन्हा सकाळी या डोंगर द-यांमधुन हातात हात घालून फिरेन अस व्हायच.. ती सोबत असताना कसलीच तमा नसायची... पण